शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:53+5:302021-02-06T05:07:53+5:30
कापडणे - येथील नूतन माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे भारती देवीदास खलाणे व ...

शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
कापडणे - येथील नूतन माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे भारती देवीदास खलाणे व नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी आसाराम निंबा माळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद, धुळेचे कृषी सभापती रामकृष्ण देवराम खलाणे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील, कक्ष अधिकारी मंत्रालय, मुंबई पवन डिगंबर खलाणे, नूतन माध्यमिक विद्यालय, कापडणेचे चेअरमन ललित देविदास खलाणे, कापडणे गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हिम्मत वनजी चौधरी, नीलेश राजेंद्र जैन, उज्ज्वला भटू माळी, महेश राजेंद्र माळी, सोनीबाई गंगाराम भिल, वैशाली विठोबा माळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.