कचराकुंडी भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST2021-07-05T04:22:52+5:302021-07-05T04:22:52+5:30
धुळे : येथील महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळील कचराकुंडी पुन्हा भरली असून कचरा बाहेर रस्त्यावर पडत आहे. ही समस्या नित्याची झाली ...

कचराकुंडी भरली
धुळे : येथील महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळील कचराकुंडी पुन्हा भरली असून कचरा बाहेर रस्त्यावर पडत आहे. ही समस्या नित्याची झाली आहे. कुंडीतील कचरा दररोज उचलणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होते.
धुळीचे साम्राज्य
धुळे : येथील बसस्थानकाच्या आवारातील डांबरीकरण उखडून खूप वर्षे झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
निर्जंतुकीकरण
धुळे : कोरोनामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये नियमित फवारणी केली जाते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सातत्याने काळजी घेताना दिसत आहेत. कार्यालयांचे निर्जंतुकीकरण केले जाते.
उकाडा वाढला
धुळे : पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असते. परंतु पाऊस पडत नाही. वातावरण दमट झाले आहे. उकाडा वाढल्याने नागरिकदेखील हैराण झाले आहेत. पावसाची प्रतीक्षा आहे.
पाण्यासाठी वणवण
धुळे : शहरात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने रहिवाशांना लोटगाडीवर ड्रम आणि भांडे ठेवून दूरवरून पाणी आणावे लागते. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे हे बोलके छायाचित्र.