पाेलीस दलातील बदली, मुख्यालयात अनेकांची लागते फिल्डींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:12+5:302021-07-08T04:24:12+5:30
कोरोनामुळे गत दाेन वर्षांपासून बदल्या लांबत चालल्या आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी सुमारे २४९ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. या ...

पाेलीस दलातील बदली, मुख्यालयात अनेकांची लागते फिल्डींग
कोरोनामुळे गत दाेन वर्षांपासून बदल्या लांबत चालल्या आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी सुमारे २४९ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. या बदलीच्या वाऱ्यांमध्ये अनेकजण मुख्यालयात बदलीसाठी इच्छुक असतात. जिल्ह्यातील काही पाेलीस ठाण्यात पाेस्टिंग मिळावी यासाठी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्षभरापासून फिल्डींग लावल्याचे बाेलले जाते. दीड महिन्यापूर्वीच काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काहींच्या अद्याप बाकी आहेत. जिल्ह्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, साक्री व शिरपूर अशा चार तालुक्यांतील १८ पोलीस ठाण्यात पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यासाठी काही पाेलीस कर्मचाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मागण्यात आले होते. काही पोलीस कर्मचाऱ्यांना व्याधी व काही अडचणी लक्षात घेऊन बदल्या दिल्याचे समजते.
या तीन ठिकाणांना पसंती
स्थानिक गुन्हे शाखा
पाेलीस कर्मचाऱ्यांची पहिली पसंती ही स्थानिक गुन्हे शाखेला असते. या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचे कामकाज चालत असल्याने अनेक कर्मचारी या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहेत.
वाहतूक शाखा
अनेक कर्मचारी वाहतूक शाखेत बदली व्हावी म्हणून फिल्डींग लावून आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी सांगवी, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा अशा उपविभागात बदली हाेण्याची मागणी करतात.
या ठाण्यात नकाे रे बाबा
शहर पाेलीस स्टेशन
शहराचा विस्तार वाढल्याने काही पोलीस ठाण्याचा भार वाढला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारीच्या ठिकाणी जाण्यास पोलिसही इच्छुक नसतात.
चाळीसगावरोड मुंबई-आग्रा महामार्गासह चोऱ्या, घरफोड्या, अपघात, खून, दरोडे अशा विविध गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या पाेलीस ठाण्यात बदली नकाेची मागणी करतात.
आझादनगर पोलीस ठाणे
शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात कायम वाद सुरू असतात. त्यामुळे डाेक्याला ताण नकाे म्हणून या पाेलीस ठाण्यात बदली टाळण्याचे प्रयत्न पाेलीस कर्मचारी करतात.