रानमळा येथे महिलांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:11+5:302021-02-05T08:44:11+5:30
नवीन काॅलनी परिसरात नागरी सुविधांचा अभाव धुळे : नवीन काॅलनी वसाहत आणि इतरही वसाहतींमध्ये स्वच्छतेची गरज आहे. मोठ्या ...

रानमळा येथे महिलांना प्रशिक्षण
नवीन काॅलनी परिसरात नागरी सुविधांचा अभाव
धुळे : नवीन काॅलनी वसाहत आणि इतरही वसाहतींमध्ये स्वच्छतेची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढले असल्याने त्याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने सापासह इतर विषारी प्राण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण अधिक असल्याने वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपळनेर येथे काेरोना योद्धांचा सत्कार
पिंपळनेर - येथील अपर तहसील कार्यालय येथे अपर तहसीलदार विनायक थविल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कोरोना योद्धांना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. पत्रकारांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव केला. यात पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप, राजेंद्र गवळी, विशाल गांगुर्डे, प्रा.शिवप्रसाद शेवाळे, भरत बागूल, अनिल बोराडे, राहुल ठाकरे, विशाल बेनुस्कर या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अनिल उचाळे, अवल कारकून राजेंद्र सोनवणे, नंदू साळुंके गणेश माळी यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.