शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी दोंडाईचा स्थानकावर रेल्वेरोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:57 IST

सकाळी झालेल्या आंदोलनामुळे अर्धा तास वाहतुकीवर परिणाम 

ठळक मुद्देजनतेच्या अडचणीकडे वेधले लक्ष शहरासह १० गावातील जनतेची अडचण विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरातील जुना शहादा रोड व दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेटमुळे  ग्रामीण जनतेची मोठी अडचण होत असून या ठिकाणी रेल्वेने पर्यायी रस्ता करावा, या मागणीसाठी सोमवारी येथील रेल्वे स्थानकावर रास्तारोको करण्यात आला. रेल्वे गेट कायमचे बंद करून अमरावती नदीच्या कोपºयाजवळ बोगदा तयार करून शहादा रोडसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मागणी करण्यात आली. ती मान्य न झाल्यास भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यााच इशारा दिला आहे. सुरत-भुसावळ रेल्वेलाईन दुहेरी झालेली असल्यामुळे हे रेल्वेगेट सतत बंद असते. तसेच दोंडाईचा रेल्वे स्टेशन गेटपासून जवळच म्हणजे रेल्वे स्टेशन व गेटचे अंतर केवळ २०० मीटर असल्यामुळे सतत रेल्वे पट्ट्यांचे काही ना काही काम सुरू असते. त्यामुळेही रेल्वे गेट बंद ठेवण्यात येते. या रस्त्यावरून रोज सुमारे २० ते २५ हजार लोकांचा वावर आहे. परंतु या परिस्थितीमुळे त्यांची प्रचंड गैरसोय होते. या गेटने जुने शहादा रोडवरील रहिवासी तसेच दाऊळ, मंदाणे, झोटवाडे, साहुर, शेंदवाडे, जुने कोरदे, नवे कोरदे, लंघाणे व तावखेडा येथील जनतेचा वावर आहे. रेल्वे गेट बंदमुळे त्यांना ताटकळत रहावे लागते. चार-पाच गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसदेखील  याच मार्गाने येतात. मात्र गेट बंदमुळे विद्यार्थी शाळेत उशीरा पोहचत असल्यानेही त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे गेट कायमचे बंद करून पर्यायी रस्ता म्हणून अमरावती नदीच्या कोप-याजवळ बोगदा तयार करून जुन्या शहादा रोडसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अन्यथा भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन उभे करण्यात येईल. त्यावेळी होणाºया परिणामांना रेल्वे प्रशासन स्वत:  जबाबदार राहील, असे निवेदनात नमूद केले आहे. या आंदोलनात पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, दाऊळचे उपसरपंच नरेंद्र भामरे, किरण पवार, भैय्या कोळी, संग्राम ठाकरे, गुलाब निकम, सुनील मगर, कुणाल माळी, दिगंबर माळी, लोटन देसले, कैलास ठाकूर, अनिल वाघ, संदीप भोई, शैलेश सोनार आदीसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Dhuleधुळेrailwayरेल्वे