विंचुर चौफुलीवर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:38 IST2019-05-19T12:37:43+5:302019-05-19T12:38:30+5:30
पोलीस पथक रवाना : नागरीक धावले मदतीसाठी

विंचुर चौफुलीवर वाहतूक कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महामार्गावरील विंचुर चौफुलीवर वाहन काढत असताना वाहतुक कोंडी झाली़ पहाता-पहाता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत़ वाहनांची रांग अंदाजे २ ते ३ किमी पर्यंत जावून पोहचली आहे़ वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त कळताच स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत़ नेमकी वाहतुक कोंडी कोणत्या कारणाने झाली हे आता स्पष्ट नसलेतरी ही कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक नागरीकांनी आता पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे़