वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST2021-07-02T04:25:03+5:302021-07-02T04:25:03+5:30
नियमांकडे दुर्लक्ष धुळे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती वेळोवेळी केली जात आहे. प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ...

वाहतूक ठप्प
नियमांकडे दुर्लक्ष
धुळे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती वेळोवेळी केली जात आहे. प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु काही नागरीक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
पथदिवे लावा
धुळे : तालुक्यातील दह्याने गावात काही गल्ल्यांमध्ये पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. गावात पथदिवे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नियमीत गटारी काढल्या जात नसल्याचीही तक्रार आहे.
आरोग्यावर परिणाम
धुळे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाचा शिडकाव होत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. तापाचे रुग्ण वाढले आहेत. अनेकांना समस्या येत आहेत.
काठ्यांना मागणी
धुळे : सध्या खरीप हंगामात पेरणीची कामे सुरु आहेत. त्यासाठी शेतकरी बियाणे, खते, साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात येत आहेत. बैलांना हाकण्यासाठी आवश्यक काठी देखील बाजारात उपलब्ध असून मागणी वाढली आहे.