शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्यांमुळे ‘ट्रॅफिक जॅम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:45 IST

भारनियमनाचा फटका : वजन करण्यासाठी ट्रॅक्टर, घंटागाड्या रस्त्यावर

धुळे : शहरातून संकलन केलेल्या ओला व सुका कचरा मोजण्यासाठी वरखेडी कचरा डेपोवर वचनकाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र सोमवारी भारनियमनामुळे घंटागाड्यासह ट्रॅक्टर अशी ९५ वाहनांची रांग लागल्याने वरखेडी रस्त्यावर ‘ट्रॅफिक जॅम’ झाला होता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह मजुरांना अडचणीचा सामना करावा लागला.शहरातील वरखेडी रोडवर १० एकर विस्तीर्ण जागेत ७० वर्षांपूर्वी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे़ नगरपालिका असताना तयार करण्यात आलेला हा डेपो महानगरपालिका होऊन बारा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही कायम आहे़ या ठिकाणी वर्षानुवर्षांपासून टाकण्यात येत असलेला कचरा आजच्या स्थितीत नेमका किती असावा हे सांगणेदेखील अवघड आहे़वाहतूक पुर्णपणे बंदशहरातून गोळा केलेला कचरा मोजण्यासाठी वरखेडी कचरा डेपोवर मनपाने वजन काट्याची व्यवस्था केली आहे़ याठिकाणी भारनियमनामुळे सकाळी ६ वाजेपासून वीजपुरवठा नसल्याने येथील कचरा मोजणारा वजन काटा बंद होता. त्यामुळे सकाळी शहरातील विविध भागातून कचरा गोळा करुन आलेल्या घंटागाडया व ट्रॅक्टर त्याठिकाणी रांग लावून उभे होते. याठिकाणी ७९ घंटागाड्या, २० ट्रॅक्टर नेहमीप्रमाणे कचरा घेऊन आल्या होत्या. कचरा डेपोवरील वजन काटा बंद असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. याठिकाणी सकाळी ११ वाजता सुमारे ९५ वाहनासह २०० ते २५० चालक व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. शेवटी महापालिकेच्या कर्मचाºयांनी दुपारी १२ वाजता जनरेटरव्दारे वजन काटा झाल्याने वाहतूकीसाठी हा रस्ता मोकळा झाला़शेतकºयांना समस्यावरखेडी रोडवरील वाहतूक सुमारे दोन ते तीन तास खोळंबली होती. त्यामुळे परिसरातील शेतातील शेती कामे खोळंबली होती. या कचरा डेपोवरील कचरा हा अनेकदा ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर येतो. या कचºयामुळे परिसरातील कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही दिवसेदिवस बिकट होत चालला आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे मनाप प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे स्पष्ट दिसते.

टॅग्स :Dhuleधुळे