थाळनेर येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:14+5:302021-07-08T04:24:14+5:30
थाळनेर येथुन वाळूची अवैधरित्या वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊ ...

थाळनेर येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
थाळनेर येथुन वाळूची अवैधरित्या वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलीस कर्मचारी प्रकाश मालचे, सिराज खाटिक, विजय जाधव, कांबळे, बागुल, पिसे व मंडल अधिकारी व्ही. के. बागुल, थाळनेरचे तलाठी एस. के. मराठे, कोतवाल यांनी तापी नदीच्या पात्रात दाखल झाले. थाळनेर येथे वाळू उपशाचा कोणताही ठेका नसतानादेखील मोठ्या प्रमाणात तापी नदीच्या पात्रातून वाळूचे उत्खनन सुरू होते. त्यावेळी कार्यवाहीसाठी पथक आल्याचे पाहून काही ट्रॅक्टर पळून गेलेत तर वाळूने भरलेल्या एक ट्रॅक्टर व चालक सुनील भिल (रा. शिरपूर) यांना ताब्यात घेतले. सदर ट्रॅक्टर थाळनेर पोलीस ठाण्यात आणून पुढील दंडात्मक कारवाईसाठी शिरपूर प्रांत कार्यालयात पाठविण्यात आले.