बाभळे फाट्यावर टमाट्याचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:02 IST2019-11-23T12:01:43+5:302019-11-23T12:02:36+5:30
मुंबई-आग्रा महामार्ग : चालक जखमी, टमाट्याचे नुकसान

बाभळे फाट्यावर टमाट्याचा ट्रक उलटला
धुळे : धुळ्याकडून इंदूरकडे भरधाव वेगाने टमाटे घेऊन जाणारा ट्रक बाभळे फाट्यावर उलटला़ यात चालक जखमी झाला आहे़ सुदेवाने जीवितहानी झालेली नाही़ अपघाताची ही घटना सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली़
एमपी ०९ एचएच ९८८४ क्रमांकाचा ट्रक टमाटे घेऊन धुळ्याकडून इंदूरच्या दिशेने निघाला़ शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सोनगीर टोल नाक्यावर पावती घेऊन ट्रक मार्गस्थ झाला होता़ त्यानंतर भरधाव वेगाने जात असलेला हा ट्रक बाभळे फाट्यावर आल्यानंतर अचानक उलटला़ यात चालक अकीम खान (२१, रा़ भोपाळ) याला पायाला दुखापत झाली आहे़ ट्रक उलटल्याने महामार्गावर सर्वत्र टमाटे पसरले होते़ त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़
घटनेची माहिती मिळताच सोनगीर टोल नाक्यावरील सुमीत शिंदे, मोहसीन शेख, डॉ़ प्रसाद मोरे, बापू पाटील, भटू वाडीले घटनास्थळी पोहचले़ त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेऊन जखमी चालकाला रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले़ शिंदखेडा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते़ यावेळी काही काळ वाहतुक ठप्प झाली होती़ ट्रक बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली़