आज ‘श्रीं’चा पुण्यतिथी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:25 IST2019-09-03T12:25:11+5:302019-09-03T12:25:29+5:30

गजानन महाराज पुण्यतिथी  : देवपूरातील रामनगर येथे आयोजन 

Today is the birthday of Shri | आज ‘श्रीं’चा पुण्यतिथी सोहळा

 मंदिरात करण्यात आलेला देखावा

धुळे : देवपूर  रामनगर येथे श्री़ गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त आज ३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे़ भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थचे अध्यक्ष गोपाल केले यांनी केले आहे़ 
पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ३० ते २ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़  मंगळवारी दुपारी १२ वाजता नवैद, आरती महाप्रसादाचे वाटप भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल त्यांच्या सुविद्य पत्नी व संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले व पत्नी सूनंदा केले यांच्या हस्ते होणार आहे़ महाप्रसादासाठी तीन क्वीटल साखरेची बुंदी, चार क्विंटल पिठाचे पिठले, पाच क्विंटलचा मसाले भात, २०० किलोचा मिरची ठेचा, पाच पोते बाजरीच्या भाकरींची व्यवस्था केली आहे़ याप्रसंगी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुमारे शंभर भाविकांनी पारायण केले़
या कार्यक्रमात हभप़ जनार्दन महाराज मराठ खेडेकर, हभप़ लक्ष्मण महाराज, तांदळवाडीकर, हभप़ शशिकांत महाराज,  भवरखेडेकर यांचे किर्तन झाले़ त्यासाठी समर्थ भजनी मंडळ, ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, गजानन महिला भजनी मंडळ, मक्ताई भजनी मंडळ, एकता भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, तुळजा भवानी भजनी मंडळांनी सहकार्य केले़  

Web Title: Today is the birthday of Shri

टॅग्स :Dhuleधुळे