श्रीकृष्ण मंदिरात सिंहासन अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST2021-06-30T04:23:37+5:302021-06-30T04:23:37+5:30
प्राचीन श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात नवीन सिंहासन अनावर तसेच १०८ दिव्यांची महाआरती व ११ तारतम सागर पारायण महोत्सवाची पूर्णाहुती श्री ...

श्रीकृष्ण मंदिरात सिंहासन अनावरण
प्राचीन श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात नवीन सिंहासन अनावर तसेच १०८ दिव्यांची महाआरती व ११ तारतम सागर पारायण महोत्सवाची पूर्णाहुती श्री ५ महामंगल पुरी धामचे गादीपती आचार्य जगतगुरु श्री श्री १०८ सूर्यनारायणदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तपोभूमी धामचे पुजारी संत श्रीपाल महाराज श्री ५ महामंगल पुरी धाम सुरत येथील संत विश्वमोहन शास्त्री, सुनील कासार उपस्थित होते. येथील श्रीकृष्ण प्रणामी मंदिर सोनगीर येथे चौथा वार्षिक महोत्सव कार्यक्रमानिमित्त श्री तारतम सागर ११ पारायण महोत्सवाचे साप्ताहिक आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता पुजारी जगदीश कासार, संजय कासार, प्रशांत तांबट व समाधी स्थळाचे पूजन ट्रस्टचे सचिव अनिल कासार व रुपाली कासार यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.