शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:57 PM

विंचूरजवळील घटना : ट्रक चालकाविरुध्द गुन्हा

धुळे : चाळीसगावहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ रविवारी सायंकाळी उशिरा घडली़एमएपी ४६ एमबी ८९७२ क्रमांकाच्या दुचाकीवरुन तीन तरुण चाळीसगावहून धुळेमार्गे सेंधवा गावाकडे काम शोधून पुन्हा घराकडे जात होते़ धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ चाळीसगावच्या दिशेने जाणारा टीएन १८ एपी ७९२० क्रमांकाचा चौदा चाकी ट्रक जात होता़ या ट्रकची जोरदार धडक दुचाकीला बसली़ या दुर्घटनेत मध्यप्रदेशातील पेवा नानला चौहान (२८), श्यामलाल बरकत खरते (३०) (दोन्ही रा़ शिवन्या ता़ सेंधवा जि़ बडवानी) आणि कानसिंग कसा रावत (१९) रा़ भामपुरा ता़ सेंधवा जि़ बडवानी हे गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ दुचाकीचाही चेंधामेंधा झाला़ अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी उशिराने विंचूर पुलावर घडली़अपघात होताच मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्याने विंचूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली़ गंभीर जखमी असलेल्या तिघांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ तसेच अपघाताची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती़ याप्रकरणी बरकत जिरला खरते (५३, रा़ शिवन्या, ता़ सेंधवा जि़ बडवानी) यांनी सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे