दोन फ्रिजसह ३ चोरटे पोलिसांकडून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:14 IST2018-03-30T16:14:49+5:302018-03-30T16:14:49+5:30
आझादनगर : १३ मार्चला घडली होती घटना

दोन फ्रिजसह ३ चोरटे पोलिसांकडून ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रात्रीचा फायदा घेत उभ्या ट्रकमधून चोरीला गेलेले दोन फ्रिज आझादगनर पोलिसांच्या पथकाने शोधून काढले़ चोरीची घटना १३ मार्चला घडली होती़ याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले़
शहरातील सुभाष चौक परिसरात गंगा टाईल्स या दुकानाजवळ ट्रक लावण्यात आला होता़ त्या ट्रकमध्ये एलजी कंपनीचे फ्रिज होते़ रात्र झाल्यामुळे चालकाने हा ट्रक तेथेच उभा करुन घरी गेला़ सकाळी परतल्यानंतर त्याला ट्रकमधील एकूण फ्रिजमधील दोन फ्रिज कमी दिसून आले़ त्यामुळे त्यांची चोरी झाली असावी असा अंदाज आल्याने त्याने याबाबतची तक्रार १३ मार्च रोजी आझादनगर पोलिसात नोंदविली होती़ तक्रारीवरुन भादंवि कलम ३७९, ४६१, ३४ प्रमाणे गुन्हाही नोंदविण्यात आला होता़
आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आय़ जी़ शिरसाठ, सुनील पाथरवट, मोबीन अन्सारी, निलेश महाजन, किरण साबळे, सोहेग बेग यांनी तपासाची चक्रे फिरविली़ बुधवारी शाहरुख युसुफ पठाण (रा़ मोगलाई), भैय्या उर्फ विजय राजू देवरे (रा़ अमर नगर, मनोहर चित्रपट गृहामागे धुळे), सनी आबा जाधव (रा़ गायकवाड चौक, जुने धुळे) यांना अटक करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन फ्रिज देखील जप्त करण्यात आले आहेत़