धुळे : तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांची गळफासाने आत्महत्या
By देवेंद्र पाठक | Updated: April 21, 2023 18:36 IST2023-04-21T18:36:35+5:302023-04-21T18:36:51+5:30
या घटनेमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धुळे : तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांची गळफासाने आत्महत्या
धुळे : साक्री तालुक्यातील दुबई भिलाटी, लखाळे आणि धुळ्यात, अशा तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
साक्री तालुक्यातील घटना
साक्री तालुक्यातील दुबई भिलाटी येथील गणेश गोविंदा पवार (वय ३०) या तरुणाने घरातील लोखंडी अँगलला नारळाची दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला तातडीने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. मोहने यांनी तपासून मयत घोषित केले.
दुसरी आत्महत्येची घटना साक्री तालुक्यातील लखाळे शिवारात गुरुवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. घराच्या समोरील शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन दिलीप वसंत चौरे (वय २७) या तरुणाने आत्महत्या केली. घटना लक्षात येताच त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. दिलीप चौरे या तरुणाला दारूचे व्यसन होते. यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त हाेत आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
धुळ्यातील घटना
देवपुरातील नकाणे रोडवर एकतानगरात सुरेश पंडित चव्हाण (वय ६०) यांचे वास्तव्य आहे. त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना लक्षात येताच त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.