धुळे जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:18 IST2020-04-24T10:18:20+5:302020-04-24T10:18:38+5:30

पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पोहचली १९वर

Three more positive patients were found in Dhule district | धुळे जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

धुळे जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून, शुक्रवारी धुळे, साक्री व शिरपूर येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधित रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १९ झाली आहे.
अहवाल प्राप्त झालेले हे नवीन रूग्ण पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १९ झाली असून, यापैकी चार जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात धुळ्यातील तीन व साक्रीतील एका रूग्णाचा समावेश आहे.

Web Title: Three more positive patients were found in Dhule district

टॅग्स :Dhuleधुळे