सामोडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST2021-06-23T04:23:49+5:302021-06-23T04:23:49+5:30

चोरांनी सामोडे येथील संजय शांताराम घरटे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटीतील कपडे व घरातील ...

Three burglaries in one night at Samode | सामोडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

सामोडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

चोरांनी सामोडे येथील संजय शांताराम घरटे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटीतील कपडे व घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यांनी खत बियाणे घेण्यासाठी ठेवलेले ३० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. त्यांच्या घरासमोर राहणारे राजेंद्र घरटे यांनी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडला असता दोन चोर मोटारसायकलीवर पळताना दिसले. त्यांना संजय घटटे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने तिथे जाऊन चौकशी केली. कै. दामोदर रघुनाथ घरटे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मात्र, बऱ्याच दिवसांपासून घरी कोणी राहत नसल्याने त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तेथून त्यांनी आपला मोर्चा बाजूच्या गल्लीतील अशोक विनायक घरटे यांच्या घराकडे वळवला. चोरट्यांनी कुलूप तोडून, इनलाॅक उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश न आल्याने त्यांनी पळ काढला. चोरीचा प्रकार पहाटे १ ते ३ वाजेदमऱ्यान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. केदारे व कॉन्स्टेबल कोकणी, वाघ यांनी सदर घटनेची पाहणी केली.

Web Title: Three burglaries in one night at Samode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.