जिल्हा परिषद सरवड शाळेला साडेतीन लाखांचे साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:13+5:302021-06-20T04:24:13+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पळासनेर टोल प्लाझाचे कृष्णा राव, एरिया दुराई, सोनगीर पोलीस स्टेशनचे ...

जिल्हा परिषद सरवड शाळेला साडेतीन लाखांचे साहित्य भेट
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पळासनेर टोल प्लाझाचे कृष्णा राव, एरिया दुराई, सोनगीर पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, सरपंच मनीषा ठाकरे, मॅनेजर चंदनकुमार, वसीम, कसम खान, इंतजार हुसेन, शिक्षण विस्तार अधिकारी बी. ए. भामरे, अजय पाटील, केंद्रप्रमुख हेमलता पाटील, उपसरपंच अलका पाटील, ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी शाळेच्या गुणवत्तेविषयी माहिती दिली. अशोक चौधरी यांनी प्रास्ताविक केले, मयुरी पाकळे यांनी सूत्रसंचालन केले, तुषार अहिरे यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन - सरवड (तालुका धुळे) जिल्हा परिषद शाळेत धुळे पळासनेर टोलवेतर्फे साडेतीन लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट देताना टोलवेचे पदाधिकारी, सा. पो. निरीक्षक प्रकाश पाटील, शिक्षण विभागातील अधिकारी.