छेडखानी करणा:या पोलिसाचा बंदोबस्त!

By Admin | Updated: February 21, 2017 00:10 IST2017-02-21T00:10:13+5:302017-02-21T00:10:13+5:30

डय़ूटीवर असताना मुलीचा केला विनयभंग

Threatened: The police settlement! | छेडखानी करणा:या पोलिसाचा बंदोबस्त!

छेडखानी करणा:या पोलिसाचा बंदोबस्त!

शिरपूर : खंडेराव महाराज यात्रेत आलेल्या बेटावद येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल संजयगीर गोसावी याच्याविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनला रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गोसावी याला अटक करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे येथील 17 वर्षीय मुलगी येथील खंडेराव महाराज यात्रा पाहण्यासाठी आली होती़ त्यावेळी गोसावी (रा. पाष्टे, ता. शिंदखेडा) याने तिची छेड काढली.
गोसावी हा पोलीस मुख्यालयात सेवारत आहे. यात्रोत्सवानिमित्त त्याला बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले  होते.
4यासंदर्भात त्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 354 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात  आला आह़े

Web Title: Threatened: The police settlement!