क्रेडीट कार्डद्वारे महिलेला हजारोचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:23 IST2019-12-17T23:23:17+5:302019-12-17T23:23:38+5:30

आर्थिक फसवणूक : वलवाडी शिवारातील आदर्श नगरातील घटना

Thousands of woman's credit through credit card | क्रेडीट कार्डद्वारे महिलेला हजारोचा गंडा

क्रेडीट कार्डद्वारे महिलेला हजारोचा गंडा

धुळे : तांत्रिक पध्दतीचा पुरेपूर वापर करीत क्रेडीट कार्डद्वारे ४१ हजाराचा गंडा महिलेला घालण्यात आल्याचा प्रकार देवपुरातील आदर्श नगरात घडला़ ही घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली असून याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला़
वलवाडी शिवारात चावरा इंग्लिश स्कूलजवळ असलेल्या आदर्श नगरात राहणाऱ्या सिमा किरण दुसाने (४८) या महिलेने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे़ या महिलेचे के्रडीट कार्ड असून त्याचा नंबर देखील आहे़
कोणीतरी कोणत्यातरी तांत्रिक पध्दतीचा वापर केला आणि पहिल्या टप्प्यात २२ हजार ५०० रुपये आणि दुसºया टप्प्यात १८ हजार ५०० रुपये अशा पध्दतीने दोन व्यवहार करत एकूण ४१ हजार रुपये बँक खात्यातून परस्पर काढून घेतले़
आपली कोणीतरी आर्थिक फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठले आणि फसवणूक कशी झाली हे सांगण्याचा प्रयत्न करीत तक्रार नोंदविली़ त्यानुसार, सोमवारी रात्री १० वाजता फिर्याद दाखल झाली़
याप्रकरणी भादंवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क) (घ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सायबर क्राईमचा गुन्हा
मोबाईलवरुन विविध व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेबसाईटचा वापर करणे शिक्षक महिलेला चांगलेच महागात पडले आहे़ अवघ्या दोन व्यवहारात तिच्या क्रेडीट कार्डवरुन रक्कम काढून घेण्यात आले़ मात्र, त्या बदल्यात काहीही न मिळाल्याने फसगत झाल्याची भावना या महिलेने पोलिसात तक्रार नोंदवून व्यक्त केली़ तक्रारीवरुन सायबर क्राईमचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

Web Title: Thousands of woman's credit through credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.