रामदेवबाबा नगरजवळ हजारो लीटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 21:27 IST2020-04-25T21:27:08+5:302020-04-25T21:27:28+5:30
पाणी गळती । पिण्याचे पाणी गटारीत

रामदेवबाबा नगरजवळ हजारो लीटर पाण्याची नासाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील ८० फुटी रस्त्यावर रामदेवबाबा नगरजवळ नटराज सिनेमागृहाच्या समोर गेल्या दोन आठवड्यांपासुन पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागली आहे़ यामुळे हजारो लीटर पाणी गटारीत जावून वाया जात आहे़
गेल्या महिन्यातच याठिकाणचा व्हॉल्व दुरुस्त करण्यात आला होता़ परंतु गळती दुरुस्त न झाल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्वच्छतेबाबत आवाहन केले आहे़ धुळे शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणीही शिल्लक राहत नाही़ यामुळे स्वच्छता पाळण्याबाबत नागरीकांना अडचणी येत आहेत़ अशा परिस्थितीत पाण्याची नासाडी योग्य नाही़ गळती दुरुस्तीची मागणी आहे़