शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात हजारो भाविकांनी घेतले कालभैरवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:43 IST

सकाळपासून मंदिरात भाविकांची झाली गर्दी, महाप्रसादाचे केले वाटप

आॅनलाइन लोकमतधुळे : येथे श्रीकालभैरव जयंती मंगळवारी उत्साहात साजरी झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीकालभैरवाचे दर्शन घेतले.एकविरादेवी मंदिरात शमीच्या झाडाखाली पुरातन श्रीकालभैरव मंदिर आहे. कालभैरव जयंतीनिमित्ताने मंगळवारी सकाळी ८ वाजता पूजापाठ, अभिषेक करण्यात आला. तसेच शहरातील पाच स्वामीसमर्थ सेवा केंद्रातर्फे सामूहिक कालभैरव अष्टकाचे पठन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ११ बटूक भैरवांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जळगावचे संजय वाणी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दरम्यान कालभैरवांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची रिघ लागलेली होती. मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी कालभैरवांचे दर्शन घेतल्याची माहिती एकविरा देवी रेणुकामाता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली.सिद्धेश्वर गणपती मंदिरशहरातील सिद्धेश्वर गणेश मंदिरातही कालभैरव जयंती साजरी झाली. यानिमित्त दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बाजरीची भाकरी, भरीत, मिरचीचा ठेचा, गुलगुले भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला अशी माहिती मंदिराचे विश्वस्त मनोहरलाल शर्मा यांनी कळविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे