दुष्काळात तेरावा महिना; महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:35+5:302021-06-29T04:24:35+5:30
धुळे - अनेक विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच अडकल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच गत झाली आहे. कोरोनामुळे गत दीड ...

दुष्काळात तेरावा महिना; महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज !
धुळे - अनेक विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच अडकल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच गत झाली आहे. कोरोनामुळे गत दीड वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे, तसेच शिष्यवृत्तही मिळेनाशी झाली आहे. बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर केले नसल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये देखील बंद होती. मात्र, आता बहुतेक महाविद्यालयातील कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असतील त्यांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.
शिष्यवृत्ती कधी मिळणार
शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून महाविद्यालयात सादर केला आहे. महाविद्यालयाने तो समाजकल्याण विभागाकडे पाठवला असल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
- विद्यार्थी
शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरला आहे. मात्र, अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही. महाविद्यालय बंद असल्याने कमवा व शिका योजनेचे मानधनही मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती लवकर मिळायला हवी.
- विद्यार्थी
शिष्यवृत्ती कधी मिळणार -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयातील कामकाज बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करता आले नाहीत. आता मात्र महाविद्यालये सुरू झाली असल्याने त्यांनी अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची वाट पाहावी लागते.
किती अर्ज ऑनलाईन सादर केले -
एससी प्रवर्ग - १२३३
व्हीजेएनटी प्रवर्ग - ६२८
समाजकल्याण विभागाने निकाली काढलेले
एससी प्रवर्ग - ६१५
व्हीजेएनटी प्रवर्ग - ३४०
महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या
एससी प्रवर्ग - ५१९
व्हीजेएनटी प्रवर्ग - ३८९