धुळ्यात चोरांनी दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:40 IST2020-02-02T22:40:14+5:302020-02-02T22:40:37+5:30

पत्रा कापून आत केला प्रवेश : रोकड घेऊन पोबारा, पहाटेची घटना दुपारी उघड

Thieves robbed two shops in the mist | धुळ्यात चोरांनी दोन दुकाने फोडली

धुळ्यात चोरांनी दोन दुकाने फोडली

धुळे : शहरातील कराचीवाला खुंटावरील दोन दुकानात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पत्रा कापून आतमध्ये प्रवेश करीत रोकड लंपास केली़रविवारी पहाटे घडलेली घटना दुपारच्यावेळी उघडकीस आली.
शहरातील पारोळा रोड मान्यवर नावाचे दुकान आहे़ याला लागून अजून एक दुकान आहे़ या दुकानाच्या वरच्या भागातील पत्रा कापून चोरटे आतमध्ये शिरले़ त्यांनी या दोनही दुकानातील रोकड लांबविली़ रविवार असल्याने ही बाब उशिराने लक्षात आली़ चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा वाकवून दिला होता़ त्यामुळे त्याचे चित्र समोर येऊ शकलेले नाही़ दरम्यान, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़
डोंगरगावला घरफोडी
कापडणे : अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे दोन ठिकाणी पहाटेच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली़ त्यात उपसरपंच प्रभाकर पाटील आणि भिकूबाई रामदास मोरे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला़ यात रोकडसह दागिन्यांचा समावेश आहे़ सकाळी ही बाब उजेडात आल्यानंतर गावात चर्चेला उधाण आले़ घटनेची माहिती नरडाणा पोलिसांना कळविण्यात आली़

Web Title: Thieves robbed two shops in the mist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.