शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

चोरट्यांनी ठोकला साक्री रोड परिसरात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:46 IST

शहर भागात चोरीचे सत्र थांबता थांबेना । अजबे नगरासह तुळजाई नगरातील घटना, हजारोंचा ऐवज लांबविला

धुळे : चोरट्यांनी सध्या शहरातील साक्री रोडवरील विविध कॉलनी भागात आपला मुक्काम ठोकला असल्याचे घडणाºया घटनांवरुन दिसून येत आहे़ साक्री रोडवरील अजबेनगर आणि तुळजाई नगरात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे़ घरमालक गावाला गेले असल्यामुळे नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकलेले नाही़ पण, हजारो रुपयांचा ऐवज लांबविला असल्याचे सांगण्यात येत आहे़ गेल्या आठवड्यांपासून धुळ्यातील विविध भागात चोºयांचे प्रमाण वाढलेले आहे़ पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढविले असलेतरी चोरट्यांनी हातसफाई करण्याचे काम काही थांबविलेले दिसत नाही़ साक्री रोडवरील संगमा चौक परिसरात असलेल्या अविनाश साळवे हे सुरत येथे गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते़ त्यांच्या घरातून नेमके काय गेले हे स्पष्ट होऊ शकले नसलेतरी हजारो रुपयांचा ऐवज गेल्याचे दिसत आहे़  तर त्याच परिसरात असलेले अजबेनगरात वैशाली मैदासे यांचे घर देखील बंदच होते़ घर बंद असल्याने चोरट्यांनी याचा फायदा उचलला़ घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत घरातील गोदरेजचे कपाटही फोडले़ कपाटातील ऐवज चोरुन नेला आहे़ नेमका किती आणि कोणता ऐवज लंपास केला हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकलेला नव्हता़ घटनांची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे़ दोनही घर मालकांना तातडीने कळविण्यात आलेले आहे़ त्यामुळे ते आल्यानंतरच चोरीला कोणत्या वस्तू गेल्या स्पष्ट होणार आहे़ तत्पुर्वी हजारो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर येत आहे़ दरम्यान, सातत्याने घडणाºया घटनांमुळे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे    राहिलेले आहे़ चोरट्यांनी हातसफाई करण्यापुर्वी कुठूनतरी दुचाकी चोरुन आणली़ दोन ठिकाणी डल्ला मारल्यानंतर चोरीच्या या दुचाकीचा पुरेपूर लाभ घेत ऐवज लंपास करीत महिंदळे शिवारात ही दुचाकी फेकून दिली आणि त्यानंतर चोरीचा जो काही ऐवज होता तो घेऊन पोबारा केला़ शहर पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही दुचाकी मिळून आली आहे़ ही चोरीची असल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी