सिमेवरील जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:18 IST2019-12-02T23:17:42+5:302019-12-02T23:18:02+5:30
वलवाडीसह महिंदळे शिवारात घरफोडी : रोकडसह दागिने लांबविले, पोलिसात गुन्हा दाखल

सिमेवरील जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला
धुळे : धुळ्यातील वलवाडी आणि महिंदळे शिवारात चोरट्यांनी हातसफाई करीत सुमारे दोन लाखांचा ऐवज लांबविला आहे़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, वलवाडी शिवारात चोरट्यांनी हातसफाई केलेले घर सिमेवरील जवानाचे आहे़
वलवाडी शिवारातील अक्षय कॉलनीत राहणाºया निता नेमीचंद पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, रविवारी पहाटे सव्वा तीन ते ४ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला़ कपाटाचे लॉकर्स फोडून १ लाख रुपये किंमतीची ४ तोळे वजनाची सोन्याची पट्टीची माळ, ७ हजार रुपये किंमतीची चांदीची लक्ष्मीची मुर्ती आणि २५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३२ हजाराचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी सोमवारी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल झाला़ निता पाटील यांचे पती नेमीचंद पाटील हे सिमेवरील जवान आहेत़
महिंदळे शिवारात असलेल्या मिनाई कॉलनीत राहणाºया कविता अधिकार पाटील या महिलेने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेनंतर ते १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून ४ हजार रुपये रोख आणि ७ हजाराचे दागिने असा एकूण ४७ हजाराचा ऐवज लंपास झाला आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पोलिसांनी तपास सुरु केला आहे़
केवळ बंद घर ठरतेय लक्ष
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाºया टोळीला सुरत येथून अटक करण्यात आली़ यानंतर चोरी, घरफोडीच्या घटना कमी होतील असे वाटत होते़ मात्र एका पाठोपाठ एक याप्रमाणे पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु झाल्याचे समोर येत आहे़ ते रोखण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे़ पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी स्वत: रात्रीची गस्त सुरु केली होती़ त्यामुळे सर्व अधिकाºयांसह कर्मचाºयांनी ही बाब गांंभिर्याने घेतली होती़ परिणामी घरफोडीचे सत्र तसे कमी होत असताना आता पुन्हा चोरट्यांनी आपले काम सुरु केले आहे़ चोºया, घरफोडीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांना आता सतर्क राहण्याची गरज असताना नागरीकांनी देखील आपल्या घराची काळजी घ्यायला हवी़ त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही़