कुसुंबा येथे ट्राॅमा केअर सेंटर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:14+5:302021-04-11T04:35:14+5:30

कुसुंबा येथे मंजूर ट्राॅमा केअर सेंटरच्या निर्णयाला गती द्यावी व लवकरच ट्राॅमा केअर सुरू व्हावे यासंदर्भात परिसरातील उडाणेसह ...

There will be a Trauma Care Center at Kusumba | कुसुंबा येथे ट्राॅमा केअर सेंटर होणार

कुसुंबा येथे ट्राॅमा केअर सेंटर होणार

Next

कुसुंबा येथे मंजूर ट्राॅमा केअर सेंटरच्या निर्णयाला गती द्यावी व लवकरच ट्राॅमा केअर सुरू व्हावे यासंदर्भात परिसरातील उडाणेसह कुसुंब्यातील ग्रामस्थांनी कुसुंबा येथे सदिच्छा भेटीप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आवर्जून सांगितले व तसे निवेदनही देण्यात आले.

कुसुंबा गावापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. महामार्गावर होणारे अपघात तसेच कोरोनाच्या महामारीत गावातील अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथील प्रा.आ. केंद्रांतील गंभीर रुग्णांना धुळ्याला नेण्याशिवाय पर्याय नसतो. तोपर्यंत वेळ झालेला असतो, रुग्ण दगावतो. आताच्या काळात ट्राॅमा केअर झाले असते तर कोविड सेंटर कुसुंब्यातच राहिले असते, पंचक्रोशीतील रुग्णांना आधार मिळाला असता, अशी भावना ग्रामस्थांनी मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर बोलून दाखवली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी कृषी सभापती किरण पाटील यांनी ट्राॅमा केअरच्या सुधारित अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळावी व ट्राॅमाला लवकरच गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना साकडे घातले.

या वेळी मंत्र्यांनी सर्व परिस्थितीचे अवलोकन करून कुसुंब्यात प्राधान्याने ट्राॅमा केअर होईलच, असे सांगितले. या वेळी उडाणेचे विठ्ठल बागुल, नाना वाघ, नवल पाटील, कमलाकर गर्दे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: There will be a Trauma Care Center at Kusumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.