शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:46 IST

सर्व व्यवहार सुरळीत : काॅंग्रेसचे जिल्हाभर जनआंदोलन, डाव्या आघाडीचाही पाठिंबा

धुळे : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंदला धुळे शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. दुकाने, आस्थापना सुरु होत्या. जिल्ह्यात कोरोनामुळे जनता कर्फ्यू असलेल्या भागांमध्ये मात्र बंद होता. काॅंग्रेस पक्षासह डाव्या आघाडीने निदर्शने करुन भारत बंदला पाठिंबा दिला.डाव्या आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी, कामगार विरोधी, जनता विरोधी कायद्यांच्या विरोधात अखिल भारतीय संयुक्त किसान सभेने नवी दिल्ली येथे गेल्या ४ महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात आतापर्यंत सुमारे ४०० शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. तरी देखील केंद्र सरकार कायदे मागे घेण्यास तयार नाही. तसेच वीज विधेयक संसदेत मंजुर झाल्यास ग्राहकांना दरवाढीचा फटका बसेल. भांडवलदारांना मात्र कमी दराने वीज देण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करावे, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे, वनाधिकार कायद्याची कसोशीने अंमलबजावणी करावी, सर्व अपात्र दावे पात्र करावे, पात्र दावेदारांच्या ताब्यातील ४ हेक्टरपर्यंतची वनजमीन दावेदारांच्या नावावर करावी यासह इतर मागण्या केल्या आहेत. निवेदनावर हिरालाल परदेशी, पोपटराव चाैधरी, एल. आर. राव, नथ`थू साळवे, वसंत पाटील, साहेबराव पाटील, शरद पाटील, राजेंद्र चाैरे, मदन परदेशी, हिरालाल सापे, जयसिंग माळी, दिपक सोनवणे आदींच्या सह्या आहेत.धुळे शहर काॅंग्रेसने देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष युवराज करनकाळ, गायत्री जायस्वाल, डाॅ. दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, बाणुबाई शिरसाठ, भिवसन अहिरे आदींच्या सह्या आहेत.दरम्यान, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने शिंदखेडा येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, संचालक प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, नगरसेवक उदय देसले, पांडुरंग माळी, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल माणिक, नगरसेवक दिनेश माळी, किसान सेल अध्यक्ष धनराज देसले, सरपंच विशाल पवार, सरपंच महेंद्र पाटील, विरेंद्र झालसे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, पंकज पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, हुसैन बोहरी उपस्थित होतेसर्वपक्षीय पाठिंबाशिरपूर : शेतकरी आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. प्रशासनाला निवेदन देवून कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना किसान सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. हिरालाल परदेशी, धुळे जिल्हा शेत मजूर युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड़ संतोष पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ,  शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन, अभिमन भोई, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भरतसिंग राजपूत,  अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले,  शिवसेना शहराध्यक्ष मनोज धनगर,  शेतकरी विकास फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन पाटील, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे, हेमराज राजपूत, प्रदिप चव्हाण, अर्जुन कोळी, उत्तमराव माळी, हिरालाल चौधरी, दिनेश पाटील, युवराज राजपूत, संजय पाटील, प्रेमकुमार चौधरी, भुपेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे