निवडणुकीत शांतता ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:34+5:302021-07-09T04:23:34+5:30

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. ही बैठक ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली. संतोष लोले म्हणाले, निमगूळ गाव एका ...

There should be peace in the elections | निवडणुकीत शांतता ठेवावी

निवडणुकीत शांतता ठेवावी

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. ही बैठक ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली.

संतोष लोले म्हणाले, निमगूळ गाव एका समाजाचे असून गावात एकजूट कायम आहे. अशीच एकजूट होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीतही ठेवावी. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच बापू ऊर्जा सोनवणे, ‘तंटामुक्ती’चे अध्यक्ष आनंदराव बागल, ग्रामपंचायत सदस्य नंदलाल बागल, शिवसेनेचे कल्याण बागल, भाजपचे संदीप सैंदा, प्रकाश बागल, मोतीलाल ईशी, गुलाब भिल, गोकुळ दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन संजय रामदास बागल, ग्रामपंचायत सदस्य हरी कुंवर, अनिल फौजी, रावसाहेब देविदास बागल, आनंदा नथू बागल, जयवंतराव आनंदराव बागल, किशोर जिजाबराव बागल, गावातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्व गटनेते यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गोपनीय विभागाचे पोलीस प्रकाश खांडेकर यांनी आभार मानले.

Web Title: There should be peace in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.