लग्नानंतर मुलींच्या शिक्षणात खंड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:45 IST2020-03-13T12:44:43+5:302020-03-13T12:45:16+5:30

शिरपूर : पटेल महिला कॉलेजमध्ये पारितोषिक कार्यक्रमात तहसिलदार आबा महाजन

There should be no break in girls' education after marriage | लग्नानंतर मुलींच्या शिक्षणात खंड नको

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तरूणींमध्ये जिद्द, चिकाटी, ध्येय व आत्मविश्वास असल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात संधीचे सोने करू शकतात़ महिलांमध्ये काही उपजत निर्णय क्षमता असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांचा कामाचा ठसा हा समाज मनावर वेगळाच असतो. शिक्षणात खंड नको लग्नानंतर मुलींच्या शिक्षणात अडथळे जास्त येतात. परंतू त्याच्यावर मात करा व आपल्या कुटुंबाचे शैक्षणिक व आर्थिक विकासाचे काम करा. साक्षर स्री कुटुंबाची मानकरी असते, असे प्रतिपादन तहसिलदार आबा महाजन यांनी केले़
शहरातील एच.आर. पटेल महिला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला़ यावेळी तहसीलदार आबा महाजन, जीवन विमा महामंडळाचे शाखा विकास अधिकारी डी.के. देवरे, शाखा विकास अधिकारी आर.एस. कुलकर्णी, प्राचार्या डॉ.शारदा शितोळे, डॉ.आर.एम. वाडीले, उपप्राचार्य डॉ.के.बी. पाटील, विद्यार्थी परिषदेचे सचिव डॉ.विनय पवार, प्रा.मनीषा चौधरी, डॉ.इंदिरा गिरासे, प्रा.एल. झेड. पाटील, डॉ.एच.आर. चौधरी, डॉ शोभा देवरे, डॉ.एच.एम. चौधरी, डॉ.राहुल सनेर, डॉ.अतुल खोसे, डॉ.आर.व्ही. मोरे, प्रा.बी.आय. परदेशी, डॉ.युवराज पवार आदी उपस्थित होते़
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. प्रा.रवींद्र विठ्ठल मोरे व प्रा.इंदिरा गिरासे यांनी पी.एच.डी. व सेट परीक्षा, प्रा.वैशाली बोरसे यांनी सेट परीक्षा, प्रा.बी.आय. परदेशी यांनी सेट परीक्षा व प्रा.विद्या पाटील यांनीही परीक्षेत यश मिळविले. तसेच डॉ.एच.एम. चौधरी व डॉ.सुनीती आचार्या यांना पी.एच.डी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता तर डॉ.के.बी. पाटील, डॉ.एच.आर. चौधरी, डॉ.गजानन पाटील, डॉ.राहुल सनेर यांनी पुस्तके प्रदर्शित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या हर्षदा कैलास मराठे (भूगोल विभाग), सविता मोरे (मराठी विभाग), आंतर विद्यापीठ खेळाडू भारती पावरा यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी सपना शिरसाठ व राष्ट्रीय सेवा योजनेची उत्कृष्ट स्वयंसेवक निकिता राजपूत, उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या नंदिनी शिरसाठ, विद्यापीठस्तरीय युवारंग व आविष्कार या स्पर्धांमध्ये माधुरी वाघ, सपना शिरसाठ, सत्तेसा किरण यांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.इंदिरा गिरासे व प्रा.विद्या पाटील केले. आभार माधुरी वाघ हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी वाघ, नीतिशा सोनवणे, आरती चौधरी, सपना शिरसाठ, गीतांजली गुरव, निकिता गिरासे, जयश्री सनेर, भाग्यश्री पवार, सविता बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: There should be no break in girls' education after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे