शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरण कक्षाचा उपयोगच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 14:59 IST

पिंपळनेर : कोरोना संशयित रूग्णांवर उपचार करण्याऐवजी धुळे, साक्रीला जाण्याचा दिला जातो सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मात्र संशयित रूग्ण याठिकाणी आल्यास या रूग्णलायातर्फे रूग्णाला धुळे अथवा साक्रीला जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे या विलगीकरण कक्षाचा उपयोगच होत नाही अशी तक्रार आहे. या संदर्भात आज भाजपतर्फे ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देवून रूग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सुरवातीचे काही दिवस पिंपळनेर शहर कोरोनामुक्त होते. मात्र आता याठिकाणीही बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंत ६५ झालेली असून, यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोना संशयितांवर उपचार व्हावेत यासाठी येथील ग्रामीण रूग्णालायात पाच खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र या विलगीकरण कक्षात कुठल्याही प्रकारचा उपचार केला जात नसल्याची तक्रार आहे.पिंपळनेर शहर व परिसरातील रुग्णांना काही लक्षणे आढळून आल्यास किंवा इतर काही त्रास होत असल्यास प्रशासनाने सांगितल्यानुसार ते पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी येतात. ग्रामीण रुग्णालयात नावालच रूग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अथवा साक्री येथे जाण्यास सांगण्यात येते. संशयित रुग्ण धुळे येथे गेल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला काहीही झालेले नाही. साक्री, येथे जाऊन अगोदर स्वॅब देण्यास सांगितले जाते व परत घरी पाठवून दिले जाते.यात रूग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असते. रूग्णांना विलगीकरण कक्षात योग्य उपचार करण्यात यावेत अशी अपेक्षा शहरवासियांनी केलेली आहे.