शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ‘कोरोना’बाधीत रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:55 IST

जिल्हाधिकारी : सुरक्षिततेसाठी एकाचे रक्ताचे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

धुळे : विदेशातून आलेल्या एकाची प्रकृति थोडी बिघडली़ ‘कोरोना’ची लागण लागल्याच्या संशयावरुन एक जण रुग्णालयात दाखल झाला होता़ परंतु त्या रुग्णाला कोरोनाची कोणत्याही प्रकारची लागण लागलेली नाही़ मात्र, सुरक्षितता म्हणून त्या रुग्णाच्या रक्ताचे नमूने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत़ अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांनी दिली़‘कोरोना’ची भीती सर्वत्र निर्माण झाली असलीतरी त्याला कोणीही घाबरु नये, स्वच्छता आणि गर्दीपासून लांब राहण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे़४०० माध्यमिक शाळांना पत्रगेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, महाराष्टÑात काही संशयित रूग्ण आढळल्याने, माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुमारे ४०० माध्यमिक शाळा, व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सूचना देत जनजागृती सुरु केली आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयी काळजी घेण्याच्या सुचना शाळांना पत्रकाद्वारे दिल्या आहेत.विद्यार्थी आजारी असल्यास त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी द्यावी असे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, खोकला किंवा ताप आला असेल तर त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात यावी. सर्दी खोकला झालेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांमध्ये न मिसळणे, नाक, डोळे, तोंड यांना वारंवार हात न लावणे, आजारी व्यक्तीपासून लांब राहावे, जवळच्या दवाखान्यात भेट देऊन तपासणी करावी, आपले हात वारंवार सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवून स्वच्छ करावेत. तसेच अन्य बहुसंख्य संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत येतांना मास्कची सक्ती करण्यात येऊ नये असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, नेर येथील माध्यमिक शाळेतही प्रार्थनेच्यावेळी कोरोना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.जिल्ह्यातील सुमारे ४०० माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कोरोनाविषयी जनजागृती व घ्यावयाची काळजी या संदर्भातील पत्रके पाठविण्यात आलेली आहेत. -डॉ.सुभाष बोरसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, धुळेधनगर आरक्षण संवाद मेळावा रद्दनेर : धुळे तालुक्यातील उडाणे येथे रविवार १५ मार्च रोजी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई शाखा धुळेने आयोजित केलेला ‘धनगर आरक्षण संवाद मेळावा’ कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधित उपायांमुळे कोणतेही मान्यवर येऊ शकत नसल्यामुळे रद्द करण्यात आला आहे़ असे सुभाष मासुळे यांच्याकडुन कळविण्यात आले़आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप मागे : संघटनाधुळे : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे संप मागे घेतला आहे़राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे़ तसेच धुळे शहरातही काही संशयित रुग्णांच्या घशातील आणि नाकातील स्त्रावाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाºयांच्या आदेशानुसार संप मागे घेण्यात आला, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष विलास वारुडे यांनी दिली़कर्मचारी महासंघाच्या नियोजित वेळापत्रकानुसार ११ मार्चला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार होता़ त्यानंतर १६ मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार होते़ गुरूवापासून बेमुदत काम बंद आणि बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार होते़ सर्व कर्मचारी सकाळी अकरा वाजता क्युमाईन क्लब जवळ आंदोलनासाठी जमले होते़ परंतु संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाºयांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य कर्मचारी नियमीतपणे आरोग्य सेवा सुरू ठेवतील, असे वारुडे यांनी यावेळी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे