शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

...तर 15 वर्षात पूर्ण होईल 100 टक्के कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:21 IST

२६ दिवसात फक्त ९ हजार २०० जणांनी घेतली लस

धुळे : जिल्ह्याने कोरोना लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र लसीकरणासाठी एवढीच कुमक असली व याच वेगाने लसीकरण होत राहिले तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हायलाकिमान १५ वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मागील २६ दिवसात ९ हजार २०० जणांना लस टोचण्यात आली आहे. प्राप्त उद्दिष्टापैकी ५३ टक्के लसीकरण पूर्ण करीत जिल्हा राज्यात आघाडीवर आला आहे. एका दिवसात सरासरी ३५४ जणांना लस टोचण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० लाख लोकांचे लसीकरण करायचे असेल तर सद्याच्या लसीकरणाच्या वेगानुसार १५ वर्षे लागतील. जर वेगात लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच लसीकरणाचे केंद्रे वाढवावी लागतील.सहा केंद्रांवर लसीकरण -जिल्ह्यात सहा ठिकाणी कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. त्यात धुळे शहरात तीन केंद्रे आहेत. धुळे शहरातील केंद्रांमध्ये जिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे प्रभातनगर आरोग्य केंद्र व मच्छीबाजार परिसरातील आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, ग्रामीण रुग्णालय साक्री व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा याठिकाणी कोरोनाची लस टोचण्यात येत आहे.९ हजार २०० जणांनी घेतली लसजिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार २०० जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली आहे. लसीकरणाच्या एकूण लक्ष्यापैकी ५३ टक्के लक्ष पूर्ण केले असून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. ५ हजार ५०० कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.आयएमएचे पंतप्रधानांना पत्रलसीकरण पूर्ण करायचे असेल तर खाजगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार आहे.त्यासाठी आयएमएच्या राष्ट्रीय संघटनेने पुढाकार घेतला आहे. लसीकरण मोहिमेत खाजगी रुग्णालयांचाही सहभाग करून घ्यावा अशी विनंती शासनाला केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिले आहे. मात्र त्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तर कमी वेळेत अधिक नागरिकांना लस टोचण्यास मदत होईल.