पांझरा नदीपात्रातून गौणखनिजची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 22:07 IST2018-07-19T22:06:13+5:302018-07-19T22:07:17+5:30

२ लाखांचा मुद्देमाल : देवपूर पोलिसात नोंद

Theft of miners from Panjhra river bank | पांझरा नदीपात्रातून गौणखनिजची चोरी

पांझरा नदीपात्रातून गौणखनिजची चोरी

ठळक मुद्देपांझरा नदी पात्रातून गौणखनिजची चोरीदोन लाखांचा मुद्देमाल जप्तदेवपूर पोलिसात गुन्हा नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरानजीक पांझरा नदीतून होणारी गौणखनिजची चोरटी वाहतूक पोलिसांच्या पथकाने रोखली़ गौणखनिजासह ट्रॅक्टर असा दोन लाखांचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी जप्त केलेला आहे़ 
तापी नदीसह पांझरा नदी, बुराई नदी अशा विविध ठिकाणाहून गौणखनिजाची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे़ यासंदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येऊनही सर्रासपणे पुन्हा गौणखनिजाची चोरी आणि त्याची वाहतूक सुरु असल्याचे समोर आले आहे़ 
एमएच १८ झेड २५० क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून साधारणपणे १ ब्रास वाळू देवपुर भागातील पांझरा नदी पात्रालगत असलेल्या विटाभट्टी भागातील रोडावरुन चोरट्या मार्गाने ट्रॅक्टरच्या माध्यमातून चोरी होत असताना देवपूर पोलिसांच्या पथकाने ती रोखली़ ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ ट्रॅक्टरसह गौणखनिज असा २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ 
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक मनोज चिंतामण गुरव आणि ट्रॅक्टर मालक विजय पंडीत पाटील (दोनही रा़ विटाभट्टी, देवपूर, धुळे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ सह खनिजे विकास अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ हेड कॉन्स्टेबल बी़ बी़ बागुल पुढील तपास करीत आहेत़ 

Web Title: Theft of miners from Panjhra river bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे