धमाण्यात दोन गट भिडल्याने तणावाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 21:38 IST2021-04-04T21:37:28+5:302021-04-04T21:38:35+5:30
परस्पर विरोधी फिर्याद, १७ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद

धमाण्यात दोन गट भिडल्याने तणावाची स्थिती
धुळे : घरासाठी लागणाऱ्या बांधकाम विटा उचलण्यासाठी मदत केली नाही या कारणावरुन वाद झाला. त्याचे पडसाद तीव्र उमटल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील धमाणे गावात घडली. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने १७ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
घराच्या बांधकाम विटा उचलण्यासाठी मदत केली नाही व शिवीगाळ केली या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमविण्यात आली. गर्दी जमा करुन महिलेस व अन्य एकाला हातबुक्क्याने मारहाण करण्यात आली. शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी महिलेचा विनयभंगही करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन नंदु बाबूलाल बैसाणे, रमेश मोहन बैसाणे, सुनील भटू बैसाणे, सुरेश भावराव बैसाणे, शालिक सुदाम बैसाणे, नाना भटू बैसाणे, हिरामण रतन बैसाणे, सिध्दार्थ प्रताप बैसाणे (सर्व रा. धमाणे, ता.धुळे) यांच्या विरोधात संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडूनही महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दादाभाऊ बाबुराव जाधव, समाधान दिलीप बैसाणे, भटू दामू बैसाणे, रमेश पंडित बैसाणे, भरत नाना बैसाणे, विकास संतोष बैसाणे, लखन लुखा बैसाणे, राहुल दिलीप बैसाणे, गोकूळ रामदास गंगावणे (सर्व रा. धमाणे ता. धुळे) यांच्या विरोधात संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.