भाजी, फळ विक्रेत्यांच्या जागांमध्ये तात्पुरते स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:34 AM2021-04-13T04:34:21+5:302021-04-13T04:34:21+5:30

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महापालिका हद्दीतील भाजी ...

Temporary relocation of vegetable and fruit vendors | भाजी, फळ विक्रेत्यांच्या जागांमध्ये तात्पुरते स्थलांतर

भाजी, फळ विक्रेत्यांच्या जागांमध्ये तात्पुरते स्थलांतर

Next

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महापालिका हद्दीतील भाजी व फळ विक्रेते यांना गर्दी न करता, अंतराने उभे करुन त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईस्तोवर हे आदेश राहणार आहेत.

- दत्त मंदिर चौक ते जीटीपी स्टॉपपर्यंतचे फळ व भाजी विक्रेते आता देवपूर शेख पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित होतील.

- देवपूर एकवीरा देवी कमान ते वाडीभोकर रोड भटेवरा हॉस्टेल येथील भाजी व फळ विक्रेते आता देवपूर पूर्व पोलीस स्थानक नदीकिनारी रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित होतील.

- एसआरपी कॉलनी, नदीपूल, मोराणकर यांच्या घराजवळील भाजी व फळ विक्रेते देवपूर नदी पुलापासून साईबाबा नगर लहान पुलापर्यंत स्थलांतरित होतील.

- मालेगाव रोड, दसेरा मैदान, अग्रसेन पुतळा येथील भाजी व फळ विक्रेते आता शासकीय दूध डेअरीसमोरील शंभर फुटी रोडवर स्थलांतरित होतील.

- भंगार बाजार ते लोकमान्य हॉस्पिटल येेथील भाजी व फळ विक्रेते आता चाळीसगाव रोड, पवन नगरजवळील शंभर फुटी रोडवर स्थलांतरित होतील.

- वडजाई रोड मच्छीबाजार पोलीस स्थानक ते स्लाटर हाऊसपर्यंतचे भाजी व फळ विक्रेते आता चाळीसगाव रोड, पवन नगरजवळील शंभर फुटी रोडवर स्थलांतरित होतील.

- पाच कंदील, चैनी रोड, अकबर चौक येथील भाजी व फळ विक्रेते आता जेलसमोरील रस्त्यावर क्युमाईन क्लबपर्यंत स्थलांतरित होतील.

- साक्री रोड जुने जिल्हा रुग्णालय ते विद्यावर्धिनी कॉलेज, कुमार नगर, सिंचन भवनजवळील भाजी व फळ विक्रेते आता स्वामी टेऊराम हायस्कूल व विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे पटांगण येथे स्थलांतरित होतील.

- आग्रा रोड फुलवाला चौक ते गांधी पुतळा, जुनी महापालिका इमारत ते पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथील भाजी व फळ विक्रेत्यांना आता ज्योती चित्रमंदिरासमोरील रस्ता ते आपला महाराष्ट्र कार्यालय ते मोठ्या पुलापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे.

(कोटसाठी)

भाजी व फळ विक्रेते यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यातून कोरोना पसरु शकतो. त्यामुळे त्यांच्या जागांचे स्थलांतर करुन गर्दी कमी करण्यासाठीचा हा प्राथमिक पर्याय आहे. लवकरात लवकर त्यांनी ठरवून दिलेल्या जागेवर स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- अजीज शेख, आयुक्त, महापालिका

Web Title: Temporary relocation of vegetable and fruit vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.