मांस नेणारा टेम्पो गरताडबारीजवळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:34 IST2019-04-06T13:34:10+5:302019-04-06T13:34:49+5:30

२ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल

 Tempered tempo seized near Garitabari | मांस नेणारा टेम्पो गरताडबारीजवळ जप्त

dhule

धुळे : मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गोरक्षकांच्या मदतीने गरताडबारीजवळ मांस वाहून नेणारा टेम्पो पकडला़
मोहाडी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली़ एमएच ०४ डीएस ९७११ क्रमांकाच्या टेम्पो वाहनात गोमांस भरलेले आढळून आले़ यावेळी चालक नूर मोहम्मद वलीओद्दीन शेख (रा़ चाळीसगाव रोड, धुळे) याला पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी मांस कुठून आणले, कुठे घेऊन जात आहे याबद्दल माहिती दिल्याने गुन्हा दाखल झाला़ दीड टन वजनाचे मांस, १ लाखांचे वाहन आणि मोबाईल असा एकूण २ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे़

Web Title:  Tempered tempo seized near Garitabari

टॅग्स :Dhuleधुळे