लाटेमुळे तापमानाचा पारा ४३ अशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:48 IST2019-05-20T11:48:06+5:302019-05-20T11:48:31+5:30
आरोग्याची काळजी घ्यावी : जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

उन्हापासुन संरक्षण मिळविण्यासाठी स्कार्फ घातलेल्या विद्यार्थींनी
धुळे : गेल्या तीन दिवसापासुन तापमानाचा पारा वाढत आहे़ शनिवारी ४३ अशांवर रविवारी देखील ४३ अशांवर स्थिर होता़ आनखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़ उष्माघातापासुन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे़
वातावरणातील बदलामुळे दैनंदिन तापमानात वाढ व जास्त प्रखर उष्मालहरी, अनुभवास येत आहेत. प्रखर उष्माघाताचा परिणाम दिसुन येत आहे़ जेव्हा प्रत्यक्ष कमाल तापमान ४५ डिग्री सेल्सियस इतके नोंदविले जाते तेव्हा उष्मालहर आहे असे मानले जाते. शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे. प्रमुख उष्माघातचे कारणे आहेत़
प्रतिबंधात्मक उपाय
वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी. उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढया रंगाचे कपडे वापरावेत. तसेच उन्हापासुन काळजी घेण्यासाठी सध्या सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी दिसत आहे़
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उष्माघात कक्ष दरवर्षीप्रमाणे कार्यान्वित करण्यात आला आहे़ नागरिकांनी वाढत्या उन्हापासुन काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़
सकाळ/सायं कमाल किमान
९ वाजता ३० ---
११ वाजता ३१ ---
१२ वाजता ४२ ---
२ वाजता ४३ ---
३ वाजता ४१ ---
५ वाजता ४० ---
७ वाजता ३९ ---