समाज अध्यक्षपदी महेंद्र चौधरी तर कार्याध्यक्षपदी मधुसूदन चौधरी यांची त्रैवार्षिक बिनविरोध निवड करण्यात आली.
दोंडाईचा : येथील बांधकाम प्रगतीत असलेल्या समाज मंगल कार्यालयात दोंडाईचा शहर तेली समाजाची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष पंकज चौधरी होते. समाजबांधवांचे मंगल कार्यालय बांधकाम, त्रैवार्षिक कार्यकारिणी निवड आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी तेली समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, ती अशी- अध्यक्ष महेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष मधुसूदन चौधरी, उपाध्यक्ष-
जगदीश चौधरी व लालचंद चौधरी ,सचिव -ॲड. सचिन चौधरी ,खजिनदार-
प्रा. धनराज चौधरी यांची तर सदस्यपदी सुरेश चौधरी, अमृत चौधरी , मुकुंदा चौधरी,
अशोक चौधरी, नाना चौधरी, हेमंत चौधरी, भगवान चौधरी, दगडू चौधरी, विनोद चौधरी, भूषण चौधरी , हेमंत चौधरी , रामकृष्ण चौधरी यांची निवड करण्यात आली. दोंडाईचा शहर तेली समाज युवक अध्यक्षपदी भूषण चौधरी, उपाध्यक्षपदी संदीप चौधरी तर सदस्यपदी आनंदा चौधरी, जगदीप चौधरी, संदीप चौधरी,अनिकेत चौधरी, हेमंत चौधरी, मनोज चौधरी,भूषण चौधरी, प्रमोद चौधरी, नीलेश चौधरी यांची निवड करण्यात आली. बैठकीत खान्देश तेली समाज तालुका अध्यक्ष रवींद्र चौधरी, तालुका तैलिक अध्यक्ष चिरंजीवी चौधरी आदींचा सत्कार करण्यात आला. बैठकीस समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.