माजी आमदारांचे सुपुत्र तेजस गोटे अपघातात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:26 IST2020-08-24T17:21:04+5:302020-08-24T17:26:46+5:30
मुंबई आग्रा महामार्ग : खड्यामुळे झाली दुर्घटना

dhule
धुळे : धुळे तालुक्यातील नगाव शिवारातून काम आटोपून घराकडे येत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील पांझरेच्या पुलावर मोठा खड्डा आहे़ याठिकाणी तेजस गोटे यांच्या गाडीचे चाक गेल्याने ते फुटले आणि त्याचवेळेस समोरुन येणाऱ्या ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून ट्रक थांबविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ तेजस गोटे सुखरुप असून गाडीचे थोडे नुकसान झाले आहे़ ही घटना सोमवारी दुपारी घडली़