तंत्रज्ञानात अतिशय वेगाने बदल होतोय्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:05 IST2020-01-01T22:05:00+5:302020-01-01T22:05:23+5:30
आंतरराष्टÑीय संशोधन परिषद : महिंद्राचे आशुतोष पांडे यांचे प्रतिपादन

Dhule
शिरपूर : सध्याच्या युगात तंत्रज्ञानात अतिशय वेगाने होणारे बदल लक्षात घेता सन २०३० पर्यंत मोबाईल व आरोग्य तपासणी करणारे यंत्र सांधेरोपण करतात त्याप्रमाणे शरीरात प्रत्यारोपण केल्यास नवल वाटायला नको असे प्रतिपादन महिंद्रा फर्स्ट चॉईसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष पांडे यांनी यंत्र अभियांत्रिकी विषयावर आयोजित आंतरराष्टÑीय संशोधन परिषदेत केले.
सावळदे येथील मुकेश पटेल टेक्नोलॉजी पार्क शैक्षणिक संकुलात मुकेश पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाने परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उमविचे माजी कुलगुरु डॉ.के.बी. पाटील, कुलगुरू डॉ.राजन सक्सेना, प्र-कुलगुरू डॉ.शरद म्हैसकर, डॉ.आर.एस. गौड, डॉ.एन.के. शर्मा, राहुल दंदे, डॉ.के.के. गुप्ता, डॉ.रवी तेरकर, डॉ.राकेश चौधरी, प्रा.विशाल फेगडे, प्रा.मनिकम रामचंद्रन, डॉ.नारायण चांडक, डॉ.बी.के. मोहंती उपस्थित होते़
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून सुमारे १५० तज्ञ संशोधक विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक प्रतिनिधींनी उपस्थिती लावली.