शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त शिक्षिकांच्या कार्याचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:52 IST

माळी समाज प्रतिष्ठाण : २५० गरजू महिलांना साड्या वाटप

धुळे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व माळी समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी विश्वकर्मा भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीमाईंना अभिवादन करीत महाजन हायस्कूलच्या शिक्षिकांचा गाैरव करण्यात आला. तसेच वंचित, विधवा, दिव्यांग अशा २५० गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका भारती माळी होत्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप देवरे यांनी मार्गदर्शन करताना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा गाैरव केला. महिलांनी देखील पुरुषांचा सत्कार करीत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बी. एन. बिरारी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका नाजनीन शेख, वर्षा भामरे, प्रा. आण्णा गजमल माळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर माळी यांनी आभार मानले.यावेळी राजू रेडे, राजेंद्र भदाणे, शालिग्राम माळी, अनिल वाघ, श्रीराम माळी, एकनाथ अडावदकर, प्रशांत माळी, महेंद्र जगताप, भरत बाविस्कर, आसाराम माळी, पवन माळी, प्रकाश महाले, चुडामण सैंदाणे, संदीप बाविस्कर, भानुदास लोहार, अशपाक शेख, मनोज कोळेकर, भीमराव वारुडे, राजू दुसाणे, राजेंद्र माळी, राजकिशोर तायडे, कल्पेश माळी, उमाकांत खलाणे, नरेश पहेलवान, शिरीष देवरे आदी उपस्थित होते.देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची रविवारी जयंती असून, हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांनी विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करावे, असे आवाहन ओबीसी विद्यार्थी, शिक्षक, पालक विकास असोसिएशनचे विलास पाटील, संजय खलाणे, काशिनाथ माळी, प्रा. जितेंद्र पगारे, अनिल सोनवणे, ईश्वर महाजन, प्रवीण पाटील आदींनी केले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे