सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त शिक्षिकांच्या कार्याचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:52 IST2021-01-02T21:51:51+5:302021-01-02T21:52:14+5:30
माळी समाज प्रतिष्ठाण : २५० गरजू महिलांना साड्या वाटप

सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त शिक्षिकांच्या कार्याचा गाैरव
धुळे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व माळी समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी विश्वकर्मा भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीमाईंना अभिवादन करीत महाजन हायस्कूलच्या शिक्षिकांचा गाैरव करण्यात आला. तसेच वंचित, विधवा, दिव्यांग अशा २५० गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका भारती माळी होत्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप देवरे यांनी मार्गदर्शन करताना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा गाैरव केला. महिलांनी देखील पुरुषांचा सत्कार करीत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बी. एन. बिरारी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका नाजनीन शेख, वर्षा भामरे, प्रा. आण्णा गजमल माळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर माळी यांनी आभार मानले.
यावेळी राजू रेडे, राजेंद्र भदाणे, शालिग्राम माळी, अनिल वाघ, श्रीराम माळी, एकनाथ अडावदकर, प्रशांत माळी, महेंद्र जगताप, भरत बाविस्कर, आसाराम माळी, पवन माळी, प्रकाश महाले, चुडामण सैंदाणे, संदीप बाविस्कर, भानुदास लोहार, अशपाक शेख, मनोज कोळेकर, भीमराव वारुडे, राजू दुसाणे, राजेंद्र माळी, राजकिशोर तायडे, कल्पेश माळी, उमाकांत खलाणे, नरेश पहेलवान, शिरीष देवरे आदी उपस्थित होते.
देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची रविवारी जयंती असून, हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांनी विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करावे, असे आवाहन ओबीसी विद्यार्थी, शिक्षक, पालक विकास असोसिएशनचे विलास पाटील, संजय खलाणे, काशिनाथ माळी, प्रा. जितेंद्र पगारे, अनिल सोनवणे, ईश्वर महाजन, प्रवीण पाटील आदींनी केले आहे.