शिक्षकांना उन्हाळी सुट्या जाहीर कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST2021-04-28T04:38:55+5:302021-04-28T04:38:55+5:30

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाचे काम ...

Teachers should be declared summer vacation | शिक्षकांना उन्हाळी सुट्या जाहीर कराव्यात

शिक्षकांना उन्हाळी सुट्या जाहीर कराव्यात

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाचे काम तसेच कोविड सर्वेक्षणाचे काम केले आहे. दरवर्षी १ मे ते १५ जून हा सुट्टीचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना बौद्धिक विश्रांती देऊन पुढील शैक्षणिक वर्षाकरिता नवीन वर्गाच्या शिक्षणासाठी नव्या उत्साहाने व उमेदीने वर्गात दाखल करून घेत असतो. सततच्या मोबाईल संगणक लॅपटॉप यांसारख्या ऑनलाईन वापरासाठी आवश्यक असलेली साधने वापरामुळे अनेक विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना नेत्रविकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेप्रमाणे याहीवर्षी उन्हाळी सुट्टी जाहीर करून १ मे ते १५ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद करावे.

Web Title: Teachers should be declared summer vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.