Taylor's store burst after Javana's house | जवानाच्या घरानंतर टेलरचे दुकान फोडले
जवानाच्या घरानंतर टेलरचे दुकान फोडले

धुळे : जवानाचे घर चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच आता त्या पाठोपाठ टेलरचे दुकान फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली़ चोरीची ही घटना वलवाडी परिसरात घडली़ हजारो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे़ यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 
रघुनाथ नारायण मिस्तरी यांचे वलवाडीतील मारुती मंदिराशेजारी असलेल्या तात्याई बिल्डींगमध्ये रघुनाथ टेलर नावाचे दुकान आहे़ रघुनाथ मिस्तरी यांनी नेहमीप्रमाणे आपले टेलरचे दुकान बंद करुन रात्री घरी निघून गेले़ चोरट्यांनी ही संधी साधून बंद असलेले दुकान फोडले़ चोरट्यांनी दुकानातील सामान अस्ताव्यस्त करुन चांगले दर्जाचे कापड आणि तयार केलेले ड्रेस चोरुन नेले़ सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी मिस्तरी गेल्या नंतर आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्यांनी दुकानातील ४ हजाराच्या रोकडसह १५ शिवलेले ड्रेस, १० ड्रेसचे कापून ठेवलेले कापड असा ऐवज लंपास केलेला आहे़ रोकड, कापड आणि ड्रेस असे मिळून सुमारे ३० ते ४० हजाराचा ऐवज असल्याचे समोर येत आहे़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे़  

Web Title: Taylor's store burst after Javana's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.