आनंदखेडे शिवारातून तालुका पोलिसांनी पकडला अफू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 10:24 PM2021-04-09T22:24:21+5:302021-04-09T22:24:28+5:30

नागपूर - सुरत राष्ट्रीय महामार्ग : दोन अटकेत, एक फरार

Taluka police seized opium from Anandkhede Shivara | आनंदखेडे शिवारातून तालुका पोलिसांनी पकडला अफू

आनंदखेडे शिवारातून तालुका पोलिसांनी पकडला अफू

googlenewsNext

धुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक एका हॉटेलजवळ होणारी अफूची तस्करी तालुका पोलिसांच्या पथकाने उघड केली आहे. एका कारसह सुमारे ६० हजाराच्या अफूची बोंडे जप्त करण्यात आली. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक फरार झाला आहे.
गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आनंदखेडे शिवारातील भारद्वाज पेट्रोलपंपानजिक एका हॉटेलजवळ अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्चाखाली पथकाने छापा टाकला. एमएच १४ ईएच ३३२४ क्रमांकाच्या कारमध्ये एका गोणीत ५९ हजार ७६० रुपये किंमतीचा ९.९३ किलो वजनाचे अफूची बोंडे, फुटलेली बारीक तुकडे असे अंमली पदार्थ मिळून आले. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अफुची बोंडे ठेवण्यासाठी तसेच त्या हॉटेल परिसराचा जागेचा वापर करताना दोन जण मिळून आले. याप्रकरणी पाबूराम दुधाराम जाट (२६, रा. आनंदखेडे, ता. धुळे) आणि प्रभुराम भक्ताराम जाट (२२) या दोघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करीत त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी अफूसंदर्भात गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली. तर याचप्रकरणातील एक जण फरार झाला आहे. पोलिसांनी ५९ हजार ७६० रुपये किंमतीची अफू आणि १० लाखांची कार, १० हजाराचे गाईडर मशिन असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Taluka police seized opium from Anandkhede Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.