अंधाराचा फायदा घेत सराफाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 22:52 IST2019-11-10T22:51:46+5:302019-11-10T22:52:24+5:30
आठ लाखांचे दागिने : धुळे शहरातील घटना

अंधाराचा फायदा घेत सराफाला लुटले
धुळे : अंधाराचा फायदा घेत एका सराफ व्यापाºयाला मारहाण करुन त्याच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री पावणेनऊ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली़ या बॅगेत सुमारे ८ लाखांचे दागिने होते़
कुणाल गोपाल सोनार (३२, रा़ चावरा हायस्कूलजवळ, वलवाडी शिवार) यांचे देवपुरातील जीटीपी स्टॉपनजिक पितांबर नगरात सोने-चांदीचे दुकान आहे़ कुणाल हे कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्यांचे वडील गोपाल सोनार यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन दागिने बॅगमध्ये भरले़ घराकडे जात असताना त्यांना वाटेतच अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकलीवर आलेल्या ३ ते ४ जणांनी अडविले़ त्यांना मारहाण केली आणि बॅग घेऊन पसार झाले़ या घटनेमुळे गोपाल सोनार हे भयभीत झाले होते़ आरडाओरड झाल्याने गर्दी जमा झाली होती़ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे़