साथीचे आजार टाळण्यासाठी दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:40 IST2021-09-23T04:40:50+5:302021-09-23T04:40:50+5:30
धुळे : पावसाळ्यात होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे अवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पिण्याचे पाणी ...

साथीचे आजार टाळण्यासाठी दक्षता घ्या
धुळे : पावसाळ्यात होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे अवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे, पाणी घेताना ओगराळ्याचा किंवा लांब दांड्याच्या भांड्याचा वापर करावा, शाैचालयातून आल्यावर व जेवणाआधी तसेच बाळास भरविताना हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावर ठेवलेले व शिळे अन्न पदार्थ खाऊ नयेत, अस्वच्छ व दूषित पाणी पिऊ नये, आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, एखादी जलवाहिनी फुटली असल्यास तत्काळ मनपाशी संपर्क साधावा, खड्ड्यातील पाण्यात नळ बुडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, उलट्यांचा त्रास किंवा जुलाब होत असल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.