साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:56+5:302021-08-20T04:41:56+5:30

आधीच कोविड-१९ रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेले सामान्य नागरिक डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांमुळे अजून संकटात सापडले आहेत. सदरची ...

Take measures to control epidemics | साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करा

साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करा

आधीच कोविड-१९ रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेले सामान्य नागरिक डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांमुळे अजून संकटात सापडले आहेत. सदरची परिस्थिती लक्षात घेता साक्री तालुक्यात शासनस्तरावर आपल्यामार्फत तालुका आरोग्य अधिकारी व साक्री तालुक्यातील विविध भागांतील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर या साथीच्या रोगांवर योग्य ते सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

तसेच साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनीही त्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित आरोग्य अधिकारी यांची बैठक घेऊन सदर तक्रारींचे लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी सदर निवेदन शिवसेना साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे ,पंचायत समिती सदस्य बाळू टाटिया, शहरप्रमुख बंडू गीते, उपशहर प्रमुख बाळा शिंदे, विभागप्रमुख गुड्डू गायकवाड, मंगेश नेहरे ,युवा सेनेचे हिम्मत सोनवणे, वैभव भिंगारे, पंकज जाधव, ढोलीपाडा येथील शिवसेना पदाधिकारी अनिल राठोड, राजेंद्र चव्हाण, राज चव्हाण, विजय राठोड सौरभ चव्हाण, नीलेश राठोड, जितेंद्र चव्हाण आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

190821\img-20210818-wa0034.jpg

साक्री तालुका शिवसेनेतर्फे विविध गावातील साथीचे आजार नियंत्रणात यावे यासाठी गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांना निवेदन देतांना पंकज मराठे, बाळा शिंदे,बंडू गिते आदी.....

Web Title: Take measures to control epidemics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.