शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

महिला सक्षमीकरणासाठी ‘माविम’ची मदत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 22:10 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक : महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे यांचे निर्देश

धुळे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी या विभागांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे दोन दिवस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गो. नि. शिंपी, माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, जिल्हा समन्वय अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.महिला आर्थिक विकास महामंडळ ही महिलांसाठी कार्य करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९७५ मध्ये झाली असून देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही माविमचे अध्यक्षपद भूषविले आहे. माविमच्या माध्यमातून राज्यात ४३१ लोकसंचलित साधन केंद्र चालविले जातात. प्रत्येक केंद्राशी ४५० ते ५०० महिला बचत गट जोडले गेले आहेत. या माध्यमातून १६ लाख महिला माविमशी जोडल्या गेल्या आहेत. कोरोना काळात या महिलांनी प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे. माविमच्या माध्यमातून बचत गटांना चार हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले असून त्याचा ९९.५ टक्के परतावा आहे, असेही त्यांनी सांगितले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. या कालावधीत धुळे जिल्ह्याने राज्याला दिलेल्या धान्य बँकेचा लाभ झाला. याच धर्तीवर व्हेजिटेबल बँक सुरू करण्याचा मनोदय आहे. तसेच अमरावती, अकोला, पालघर जिल्ह्यात गोट बँकेचा उपक्रम पथदर्शी म्हणून राबविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी महिलांसाठी असलेल्या विविध योजना माविमच्या माध्यमातून राबवाव्यात. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. त्यासाठी माविमच्या जिल्हा कार्यालयाने दहा दिवसांत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश ठाकरे यांनी दिले.जिल्हाधिकारी संजय यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच राज्य शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. आता ‘माझी जबाबदारी- माझे कुटुंब’ ही मोहीम सुरू केली आहे. अशा परिस्थितीत समाजाचे सक्षमीकरण होण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. ते करतानाच त्यांना स्वावलंबी करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील. धुळे जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येईल. शासकीय योजनांचा लाभ देताना गावनिहाय प्राधान्य असेल. कोरोना सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी न्यूट्री गार्डन, पसरबागेचा उपयोग होईल. स्कील गॅप शोधून त्याच्या प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागूल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंपी आदींनी आपापल्या विभागामार्फत महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. माविमचे जिल्हा समन्वयक भदाणे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली.

टॅग्स :Dhuleधुळे